श्यामलाल प्राथमिक विद्यालयात ध्वजारोहण संपन्न.
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल प्राथमिक विद्यामंदिरात 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात थाटामाटात श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गिरीश मुंडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक उगिले, मोरतळे अवंतिका, निमंत्रित पालक,माजी शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय प्रभावी भाषेत श्यामलाल प्राथमिकचे चिमुकले विद्यार्थी फफागिरे यश, थोरे तन्वी, अथर्व बिरादार, आरोही नवबोद्धे यांनी आपले मनोगत उत्कृष्ट रित्या सादर केले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उत्कृष्ट नृत्य तसेच लेझीम नृत्य कामन्ना श्रावणी, श्रद्धा मादलापुरे,स्वानंदी दावणगावे,जानवी कमलापुरे व संच यांनी सादर केले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन अंतेश्वर बिरादार यांनी केले, स्वागत गीत व आभार व्यक्त करण्याचे कार्य रणमले सरशाबाई यांनी केले . मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
