अहमदपूर येथे शिवसेनेच्या ( शिंदे गट ) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड
अहमदपूर : ( गोविंद काळे ) शहरात शिवसेनेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हाप्रमुख ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांच्या हस्ते या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार आणि संघटक मा. आ. राजन साळवी, उपनेते आनंदराव जाधव, संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवास क्षीरसागर आणि सहसंपर्कप्रमुख रवी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पदाधिकारी निवडले गेले आहेत.
फुले नगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये बालाजी बेडके यांची शिवसेना शहर विभाग प्रमुखपदी, अविनाश तिडोळे यांची शिवसेना उप-शहरप्रमुखपदी, सरफोरोज सय्यद (शफीभाई) यांची शिवसेना उप-शहरप्रमुख (पूर्व) पदी, अजय पवार यांची शिवसेना शहर विभाग प्रमुखपदी, ऋषभ पाटील यांची शिवसेना शहर विभाग प्रमुखपदी, योगेश स्वामी यांची शिवसेना उप-शहर विभाग प्रमुखपदी, राजू जाधव यांची शिवसेना उप-शहर प्रमुखपदी आणि प्रवीण केंद्रे यांची शिवसेना उप-तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख सौ. उर्मिला भगत, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष जनार्दन भालेराव, ओबीसी/व्हीजेएनटी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गुट्टे, मागासवर्गीय महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रीती कोळी, तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ, उपतालुकाप्रमुख प्रवीण केंद्रे, तसेच युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील आणि युवासेना शहर प्रमुख सूरज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांनी व्यक्त केला.
