अहमदपूरमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन शासकीय समारंभात उत्साहात साजरा

0
अहमदपूरमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन शासकीय समारंभात उत्साहात साजरा

​अहमदपूर ( गोविंद काळे ) भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन अहमदपूर येथील जिल्हा परिषद मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
​यावेळी व्यासपीठावर तहसीलदार उज्वलाताई पांगरकर, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पोलीस निरीक्षक वीरप्पा भुसनरे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरव चवंडा यांनी केले.
​या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई कांबळे, प्रा. डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बाबासाहेब देशमुख, प्रा. विश्वंभर स्वामी, सुरेश डबीर, मेघराज गायकवाड, बाबासाहेब कांबळे, बालाजी पारेकर यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!