देशभक्तीपर गीतांनी गुंजले अहमदपूर; तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
देशभक्तीपर गीतांनी गुंजले अहमदपूर; तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

​अहमदपूर ( गोविंद काळे ) स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील संवाद ग्रुपने आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला अहमदपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात तब्बल पाच तास एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात आले.
​लातूर, नांदेड आणि तेलंगणा येथून आलेल्या नामवंत गायकांनी ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘मेरे देश की धरती’, ‘हर करम आपणा करेंगे’ आणि ‘मेरा कर्मा तू’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून टाकले. अहमदपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुजीब पटेल जागीरदार होते, तर माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त मंचकराव पाटील, अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, शिवानंद तात्या हेंगणे, शिवाजीराव खांडेकर, शिवाजी पाटील, आणि ॲडव्होकेट भारत भूषण क्षीरसागर हे मान्यवरही उपस्थित होते.
​या कार्यक्रमात तेलंगणा येथून असगर भाई, नांदेडहून कबीर भाई, लातूरहून बलभीम हरणे, अश्विनी सुनापे, दिपाली राकडे आणि सोनाली राऊत यांनी आपली कला सादर केली. स्थानिक गायक झुंजुलवार, आरेफ मोहम्मद, इसरत कादरी, रहीम पठाण आणि इतर स्थानिक कलाकारांनीही उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संवाद ग्रुपचे अहमद तांबोळी, मेहबूब भाई गुत्तेदार, नाझीम शेख आणि जिलानी शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अहमदपूरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
​यावेळी डॉ. अशोक सांगवीकर, मोहीब कादरी, कपिल बिरादार, सतीश नवटक्के, तानाजी राजे, आशिष तोगरे, गजानन परांडे, मुसाभाई, जावेद बागवान, प्रकाश फुलारी आणि अजहर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!