अनेक तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश
उदगीर (प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याने प्रेरित होऊन, उदगीर तालुक्यातील तोगरी येथील तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तोगरी येथील प्रशांत माधवराव गंगण्णा, मनोज मल्लिकार्जुन महादा,सतीश उमाकांत भताटे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षात पक्ष प्रवेश घेतला असता प्रशांत गंगण्णा यांची ग्रामीण तालुका उपाध्यक्ष पदी तर मनोज मल्लिकार्जुन महादा यांची-तालुका सरचिटणीसपदी तसेच सतीश उमाकांत भताटे यांची तोगरी पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रहार तालुका संघटक सोपान राजे, तालुका चिटणीस बळीराम चौधरी, शहर संपर्क प्रमुख अमित खंदारे, शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे, संदीप भीमसेन पाटील,संगमेश्वर बसवराज महादा, गंगाधर उमाकांत संग्रामपटले,विद्यार्थी शहर प्रमुख मंगेश येरकुंडे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
🙏
