‘श्रावणात घननिळा’ याकवीसंमेलनाचे सोमवारी आयोजन

0
'श्रावणात घननिळा' याकवीसंमेलनाचे सोमवारी आयोजन

उदगीर (प्रतिनिधी)
मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीर व ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय चांदेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .

चांदेगाव येथे 18 ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कवी नरसिंग इंगळे हे राहणार असून कवी संमेलनाचे उद्घाटन श्यामलाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कवी गझलकार ॲड. सुपोषपाणि आर्य यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर ,सचिव प्रा .रामदास केदार , कोषाध्यक्ष प्रा .चंद्रशेखर मलकमपट्टे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शिंदे, प्रा . ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, सहकार्यवाह अनिता येलमटे,एकनाथ राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून उदगीर मसापच्या नवीन कार्यकारिणीचा यावेळी ज्ञानसागर वाचनालयाच्या वतीने सत्कार केला जाणार आहे .
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे,चांदेगावचे सरपंच सुधाकर मुसने,वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग मुसने,सचिव चंद्रकांत शिरसे यांनी केले आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!