स्वतंत्रता मिळण्यासाठी अगोदर देशाची फाळणी व्हावी लागली, हे दुःखदच – बाळासाहेब बिराजदार
उदगीर:(प्रतिनिधी) येथील लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालयात अखंड भारत संकल्प दिवस संपन्न झाला.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश मातेकर, प्रमुख पाहुणे बाळासाहेब बिराजदार , मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले उपस्थित होते.
बाळासाहेब बिराजदार यांनी आपल्या मनोगतात धर्माच्या आधारावर झालेल्या भारताच्या दुर्दैवी फाळणीची भळभळती जखम आजही सर्व भारतीय जनमाणसांच्या मनात घर करून आहे. ही फाळणी होऊ नये म्हणून ज्या क्रांतिकारकांनी योगदान दिले, त्याबद्दलचा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. या अखंड भारत संकल्पनेला मार्गी लावण्यासाठी जवळजवळ पाच लाख लोकांनी काम केले.
अध्यक्षीय समारोपात ज्ञानेश मातेकर यांनी अखंड भारत दिनाची संकल्पना मांडून राष्ट्रीय एकतेचे महत्त् अधोरेखित केले.
याप्रसंगी एन सी सी कॅडेट व अन्य विद्यार्थ्यांनी मशाल रॅलीत सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका देवकते, तन्वी श्रीमंगले यांनी तर प्रास्ताविक संदीप जाधव, स्वागत परिचय रागिनी मठपती, देशभक्तीपर गीत अन्वी स्वामी ,सृष्टी माने तर आभार सुजाता जिंकलवाड हीने मानले.
