अहमदपूरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती येथील साठे चौकात साजरी करण्यात आली.आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे माजी सभापती ॲड. टि.एन.कांबळे तर व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते गणेश हाके, जेष्ठ विधिज्ञ ॲड.आर.एस.वाघमारे, आगार प्रमुख शंकर सोनवणे,शिवानंद हेंगणे, जि.प.सदस्य माधव जाधव, शिवाजी खांडेकर,पो.नि.नानासाहेब लाकाळ, नगरसेविका महानंदा डावरे, नगरसेवक सय्यद सरवर लाल,अभय मिरकले, साहित्यिक एन.डी.राठोड,डाॅ.शिध्दार्थ कुमार सुर्यवंशी, तुकाराम हारगिले, डि.जी.वरवटे, अण्णाराव सुर्यवंशी,गोपीनाथ जोंधळे,डाॅ.मधुकर कसबे, मुन्ना सय्यद, दयानंद पाटील, बालाजी जंगापल्ले,ग्यानोबा घोसे, प्रा.दिलीप भालेराव,शिवाजी सुर्यवंशी, राजकुमार गोंटे, रमेश भालेराव, प्रा.बालाजी कारामुंगीकर, सुग्रीव बेले,जीवन गायकवाड, मारोती बुद्रुक पाटील, विनोद नामपल्ले, अशोक सोनकांबळे, प्रा.दिपक बेले, विश्वांभर जिवारे,अंकुश पोतवळे,शिवाजी कांबळे, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.
आमदार बाबासाहेब पाटील, जेष्ठ नेते गणेश हाके,ॲड.आर एस.वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनला दिशा व चालना देणारे ठरले असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वाचे ठरले आहे.साहित्यात जागतिक संरचनामधे दलीत व कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. या साहित्याचे वाचन करणारा प्रत्येक नागरीक आपल्या जिवनात प्रगतीकडे वाटचाल करेल असे मतही या वेळी पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमराव माने यांनी तर सुत्रसंचालन लसाकमचे प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार आशिष तोगरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष सुनील डावरे,मुकुंद वाघमारे, जगदीश वाघमारे प्रदीप डावरे आदींनी परीश्रम घेतले.