अण्णा भाऊनी लोकांचं जगणं साहित्यातून मांडलं – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

अण्णा भाऊनी लोकांचं जगणं साहित्यातून मांडलं - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : वंचित बहुजनाच्या व्यथा आणि कथा दारिद्र्य परखडपणे अण्णाभाऊंनी लोकांचं जगणं साहित्यातून मांडलं अण्णाभाऊ हे खरे लोक लेखक असून ते लोकसाहित्यातील शुक्रतारा होते असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी मांडले. काजळ हिप्परगा ता. अहमदपूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती च्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. प्रल्हाद कापसे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपसरपंच शिरीष नवटक्के, प्रा.बालाजी कारामुंगीकर, प्रा.मनोज कुमार रेड्डी,ग्रामसेवक राजारामजी कांबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुरावजी जंगापल्ले, दिलीप कापसे,गोरटे, जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रविण भैय्या बाबुराव जंगापले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले की अण्णाभाऊ निरक्षर होते. साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्व साहित्यातून वंचित आणि बहुजनांच्या व्यथा दारिद्र्य मांडण्याचे काम अण्णाभाऊंनी केले.तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. त्यांचे साहित्य लोकांना प्रबोधन करणारे होते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेला त्यांनी जागृत केले.साहित्यरत्न लोक लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक जुलमी सत्तेच्या विरोधात बंड करून उठतो त्यांचं साहित्य म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जगणं होतं.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी लाल बावटा पथक स्थापन करून आपल्या लोककलेला साहित्याचा साज चढवला. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।ही त्यांची गाजलेली लावणी त्या काळी लोकांच्या हृदयावर राज्य करत होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.यह आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर देताना पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या.सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरील साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. अण्णाभाऊंनी दुःख दारिद्र्य यातना शोषण उच्चनीचता भोगत आपल्या झोपडीत राहून जगाला लाजवेल अशी हृदयाला पाझर फोडणारे साहित्याची निर्मिती केली असून अण्णाभाऊं लोकांचं जगणं साहित्यातून मांडणारे कोहिनूर हिरा होते असे प्रतिपादन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
यावेळी प्रा.बालाजी कारामुंगीकर मनाले की महापुरुषांचा आदर्श विचार युवकांनी डोक्यात घ्यावा व्यसनापासून दूर राहून अण्णा भाऊंच्या साहित्यातील जगणं काय होतं याचा विचार युवकांनी करावा आज तशी परिस्थिती नसतानाही आजची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. तरच जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल असेही कारामुंगीकरसर यांनी सांगितले. यावेळी जयंती मंडळाने 100 वृक्षाची लागवड करून मास्कचे ही वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिर आयोजित केले त्यात 51 मुलांनी रक्तदान देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भैय्या यांनी केले. सूत्रसंचालन संगमेश्वर जंगापल्ले आणि अजय जंगापले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आशिष जंगापले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व युवा तरुणांनी सहकार्य केले.

About The Author