खरीप हंगामाचा पिक विमा न देता केली शासनाने फसवणूक – भाजपा कि.मो.सरचिटणीस दिलीपराव देशमुख

खरीप हंगामाचा पिक विमा न देता केली शासनाने फसवणूक - भाजपा कि.मो.सरचिटणीस दिलीपराव देशमुख

अहमदपूर (गोविंद काळे) : खरीप हंगाम 2020 चा पिक विमा न दिल्यामुळे आघाडी सरकारने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी अहमदपूर येथील पत्रकार परिषदेत केली. अहमदपूर जिल्हा लातूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख म्हणाले की खरीप हंगाम 2020 मधील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक संरक्षणार्थ भरलेला पिक विमा आज पर्यंत या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मिळवून दिला नाही. या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी निषेध करते आहे. गत खरीप हंगाम हा निसर्गाच्या प्रजन्यमान जास्त होऊन सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. बळी राजा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी जाय बंद होत असताना आघाडी सरकार मात्र शेतकऱ्या कडे दुर्लक्ष करत आहे. नुकसानी संदर्भात गत हंगामात शासनाने अनुदान वाटप केले व शेतकऱ्यांनी पीक संरक्षणात भरलेला पिक विमा हा शेतकऱ्यांना लागू केला नाही 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन कळविले पाहिजे अशी जाचक आठ शासनाने व पिक विमा कंपनीने काढलेली आहे. पाच पाच दिवस पावसामुळे खेड्यापाड्यातील लाईट बंद होती, इंटरनेटचा खेळखंडोबा होता अनेक कामांमध्ये इंटरनेट चालत नव्हतं सर्व वेबसाइट हँग झाल्या होत्या व शेतकऱ्यांत तेवढी जागृती आज आहे काय झाले.मी आज भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधू इच्छितो की गेल्या हंगामातील सोयाबीन पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
आम्ही तसेच अतिवृष्टीमुळे सहा हजार आठशे अनुदान हे दिले पण पिक विमा दिला नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे शासन मान्य करत पण महाविकास आघाडी सरकार मान्य करायला तयार नाही तर अहमदपूर चाकूर तालुक्यात एकूण 60 हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. अहमदपूर चाकूर तालुक्यातील एकूण 60000 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता तरी शासनाने आजतागायत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिलेला नाही. विधिमंडळात हा विषय मांडला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस, चंद्रकांत दादा पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश आप्पा कराड, अभिमन्यु पवार या सर्वांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळवून देणार वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार. आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.
माझी आपल्या अहमदपूर चाकूर या विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की आपण आपल्या कडील विमा भरलेली पावती झेरॉक्स प्रत व कृषी सहाय्यक काकडे एका अर्जाचा नमुना आपल्याकडे पाठवीत आहे आपण आपापल्या गावातून हे सर्व अर्ज जमा करून आपापल्या संबंधित कृषी सहाय्यक आकडे जमा करून घ्यावी व ते सर्व जमा झाल्यानंतर आपण शासन दरबारी ज्याप्रमाणे आपण कृषी सहाय्यक का मार्फत अनुदान बिलात त्यांच्या पंचनाम्या नुसार शासनाकडे पिक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते, सरचिटणीस दत्ता जमालपुरे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे, जब्बार पठाण,जयदीप पाटील, आनंदराव पाटील, द्वारकादास नाईक, विजय चिंते आदींची उपस्थिती होती.

About The Author