संस्कार प्राथमिक शाळेत शिक्षणमहर्षी कै.विठ्ठलराव तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : संस्कार प्रा.शाळेत पद्मावती विभाग व विद्यानगर विभाग या ठिकाणी पद्मावती शिक्षण संस्थेचे संस्थापक ,प्रेरणास्थान आदर्श शिक्षक, परळीभूषण कै.विठ्ठलराव तांदळे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव दिपक तांदळे सर, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका, आदर्श पुरस्कार प्राप्त श्रीमती गित्ते पी आर मॅडम, डॉ.सोनवणे साहेब, माधुरी तांदळे मॅडम ,शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकाडे सर.अभिनव शाळा परळी वै शाळेचे शिक्षक श्री कातकडे सर पर्यवेक्षक श्री इंगळे सर,पाचंगे सर यांची उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात ही कै.विठ्ठलराव तांदळे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कै.विठ्ठलरावजी तांदळे सर यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 2013 मध्ये झाला. यावेळी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी ते म्हणाले की, ” परळी शहराजवळ सरडगाव या ठिकाणी शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत घेतले व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी परळी या ठिकाणी प्रवेश घेतला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षणाचे धडे गिरवले व आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी त्यावेळी शिक्षण घेत असताना मनाशी निश्चय केला कि माझ्या वाट्याला जो शिक्षण व नोकरी साठी जो संघर्ष आला तो गोरगरीब मुलाला येऊ नये म्हणून त्यांनी १९८७ साली पद्मावती गल्लीत पद्मावती शिक्षण संस्थेची स्थापना करून गरिबांच्या मुलांना मोफत व उच्च दर्जाचे मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी संस्कार प्राथमिक शाळेची स्थापना केली या छोट्याश्या रोपट्याचे आज आपल्याला वटवृक्ष झालेला दिसतो त्यामागे कै. विठ्ठलराव तांदळे सर यांनी अहोरात्र परिश्रम केले”. यावेळी शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उरगुंडे सर प्रस्तावीक तांदळे मॅडम तर आभार प्रदर्शन जगताप सर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास यशश्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी मेहनत घेतली.