वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत युवा नेते गोविंद सोनवणे यांची पुरग्रस्तांना मदत

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत युवा नेते गोविंद सोनवणे यांची पुरग्रस्तांना मदत

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी स्वताच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तसेच वाढदिवस साजरा न करता पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पुरग्स्तांना आर्थिक मदत केली असून पन्नास हजार रुपये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या कार्याचे पंकजाताई मुंडे यांनी कौतुक केले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल सत्कार केला. आज 29 जुलै रोजी भाजपाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. माजी ग्रामविकास मंञी तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे स्वत या फेरीत सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी सामाजिक जाणिवेतून आपला वाढदिवस साजरा न करता पुरग्रस्तांसाठी पन्नास हजार रुपयांची मदत दिली. सदर मदत त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. पंकजाताई मुंडे यांनी या राष्ट्रीय कार्याबद्दल गोविंद सोनवणे यांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, जयश्रीताई गित्ते-मुंडे, गणेश कराड, शशिकांत मुंडे, गोविंद मोहेकर, चंद्रकांत देवकते, महादेव फड, प्रा.बिभीषण फड, गोपी कांगणे, श्रीनिवास राऊत यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. गोविंद सोनवणे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

About The Author