अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा तरुणांनी घ्यावी – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : अण्णा भाऊंच्या साहित्यात उपेक्षित, कामगार, शेतकरी, शेतमजुर यांचे जीवन रेखाटले आहे. तरुणांनी त्यांच्या साहित्याची प्रेरणा घेवून शिक्षण घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले ते येथील सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती अॅड. टी. एन. कांबळे हे होते तर यावेळी मंचावर भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जेष्ठ विधिज्ञ अॅड. आर. एस. वाघमारे, दलित मित्र उत्तम माने, शिवानंद तात्या हेंगणे, पो. निरिक्षक लाकाळ, सहा. पो. निरिक्षक ठाकुर मॅडम, नगर सेविका डावरे, अण्णाराव सुर्यवंशी, माजी प्राचार्य तुकाराम हारगिले, माधवराव जाधव, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, दत्ता वरवटे, ग्यानोबा घोसे, बालाजी जंगापल्ले, रामनाथ पलमटे, विनोद नामपल्ले, मुजिब भाई आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, अण्णा भाऊंचे सबंध साहित्य अंर्तमुख करणारे आहे. गुलाम व्हायचे नसेल तर महापुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. आज समाजाला महापुरुषांच्या विचारांची खुप आवश्यकता आहे. समाजातील तरुणांनी महापुरुषांच्या विचारधारेची जोपासणा करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सत्तेची फळे सर्वांना मिळाली पाहिजे. महापुरुषांच्या कार्यामुळेच आज सन्मानाचे जीवन मिळाले आहे असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अॅड. टी. एन. कांबळे म्हणाले की. महात्मा जोतिबा फुले. शाहु महाराज, लहुजी साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे य यांचे विचार जोपासणे आवश्यक आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचा समाजाच्या उत्थानासाठी उपयोग करुन घेतला पाहिजे. अण्णा भाऊंचे कार्य समाजातील पददलित, वंचित, उपेक्षितांसाठी प्रेमरणादायी आहे. असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, अॅड. आर. एस. वाघमारे यांचे यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित मित्र उत्तम माने यांनी केले. ध्वजारोहन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल डावरे, कार्याध्यक्ष मुकुंद वाघमारे, उपाध्यक्ष दयानंद घेरे, माधव समुखराव, सचिव सुभाष गुंडिले, सहसचिव बालाजी शिंदे, कोषाध्यक्ष नरसिंग सांगवीकर आशिष तोगरे, नितिन डावरे, माधव समुखराव, शाम डावरे, किशन डावरे, नरसिंग वाघमारे, बाळु वाघमारे, दशरथ कांबळे, पप्पु समुखराव, आकाश डावरे, पिंटु समुखराव, किरण वाघमारे , नवनाथ डावरे यासह जयंती महोत्सव समितीचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी लसाकम तालुका अध्यक्ष, रमेश भालेरावएकनाथ पलमठे(उपाध्यक्ष)गणेश वाघमारे(कोषअध्यक्ष), गंगाधर साखरे, शशिकांत गायकवाड( माजी जिल्हाउपाध्यक्ष), अंतराम पिटाळे(माजी अध्यक्ष, प्रा.दिलीप भालेराव, प्रदीप पिटाळे, प्रा.संभाजी दुर्गे, सुग्रीव बेले, दत्तात्रय वाघमारे ( सचिव), मनोहर कवडेकर, भगवान वाघमारे, वाघमारे बी.पी., दशरथ शिंदे, प्रा.बालाजी कारामुंगीकर, श्रावण वाघमारे, नरसिंग कांबळे, ज्ञानोबा गायकवाड, मनोहर सूर्यवंशी, सीताराम शिंदे, जोहारे पिराजी, शरद कांबळे,राजकुमार गोंटे, अंकुश पोतवळे, विश्वभर जिवारे, शिवाजी कांबळे, शिवाजी सुर्यवंशी उपस्थिती होते.