उपशिक्षणाधिकारी गजानन तुरनर यांनी केले यशवंत कलाविभागाचे कौतुक

0
उपशिक्षणाधिकारी गजानन तुरनर यांनी केले यशवंत कलाविभागाचे कौतुक
 अहमदपूर (गोविंद काळे)

यशवंत विद्यालय अहमदपूर येथे शाळा तपासणीसाठी उपशिक्षणाधिकारी गजानन तुपकर, केंद्रप्रमुख एस बी कासार यांनी सरांनी दिली भेट.
विद्यालयाच्या शाळा तपासणी वेळी शाळेचा घोषवारा, खिचडीचे चव रजिस्टर,शालेय पोषण आहार,पॅटचे पेपर,मस्टर याबाबत तपासणी केली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलांनी बाल वयातच अभ्यासासोबत ऊर्जादायी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा आणि आपले जीवन घडवावे असे आग्रही प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी गजानन तुरनर यांनी मत व्यक्त केले.
भारतीय सैनिकांना पाठवण्यात आलेल्या राख्यांचा उपक्रम, रंगीत कागदी फुले, टाकाऊ वस्तु पासून साकारलेले मुखवटे, टाकाऊ कपड्या पासून साकारलेले फलक पुसण्याचे डस्टर, बी आय एस क्लबचे उपक्रम तसेच ग्रामीण कला संस्कृतीचा दर्शन घडविणारी,रंगसंगतीचा सुरेख मिलाप साधून शिवलेली गोधडी/वाकळ
लोकजीवनातील एक उपयुक्त व भावनिक वस्तू जुन्या कपड्यांचे तुकडे जोडून शिवून तयार केलेले एक प्रकारचे पांघरूण ग्रामीण भागात वापरली जाते.
आनंददायी शनिवार या उपक्रमातून कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपशिक्षणाधिकारी गजानन तुरनर यांनी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे ,व्यासपीठावर केंद्रप्रमुख एस बी कासार, उप प्राचार्य दिनेश तोंडारे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, उपक्रमशील शिक्षक रमाकांत बिलापट्टे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख कासार यांनी सर्वच क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेण्यासाठी मन लावून अभ्यास करावा असे जाहीर आवाहन केले.
उपशिक्षणाधिकारी गजानन तुरनर हे यशवंत विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि एम पी एस सी करून ते उपशिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणीच्या निमित्ताने इथे आल्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, ग्रंथ देऊन प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन माधव वाघमारे यांनी आभार राम तत्तापुरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला कलाशिक्षक महादेव खळुरे, सचिन खानापुरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!