बौद्ध विहाराचे निकृष्ट काम, स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळाची गुन्हे दाखल करण्याची मागणी
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथे विश्वशांती बौद्ध विहार जवळपास 20 करोड रुपये खर्च करून बांधण्यात आले. त्या बौद्ध विहाराला उद्घाटन होऊन एक वर्ष ही झाले नाही. तोच मध्यंतरी झालेल्या किरकोळ पावसाने बौद्ध विहार सर्व बाजूने गळू लागले आहे. अत्यंत तकलादू आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यामुळे बुद्ध विहार गळत आहे. हे लक्षात आल्यानंतर वॉटरप्रूफिंग च्या नावाने संपूर्ण बौद्ध विहाराला डांबर फासले जात आहे. पांढराशुभ्र असलेला रंग काळा केला जात असल्याने उदगीर शहरातील बौद्ध बांधव प्रचंड संतापले आहेत. कोट्यावधी रुपयांचे काम बोगस आणि तकलादू झाल्यामुळे संबंधित गुत्तेदारावर गुन्हे दाखल करावेत आणि या बांधकामाची क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी केली जावी. अशी मागणी स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याच दरम्यान उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक गजानन साताळकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर प्रेमी जनतेची बैठक होऊन उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनात या बांधकामाची चौकशी केली जावी, शासनाने एवढा मोठा निधी देऊन देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे एक वर्षाच्या आतच बौद्धविहार गळू लागले आहे. बौद्ध विहार ही सर्व बौद्ध बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. असे असताना देखील भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोपही स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळ आणि बौद्ध बांधवांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
