विकास नगरचा राजा बाल गणेश मंडळ उदगीर तर्फे भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न.
उदगीर (प्रतिनिधी) विकास नगर च राजा बाल गणेश मंडळातर्फे रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मागील मुख्य हेतु म्हणजे युवती, महिलांच्या हातातील कलेला वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबवला, भरपूर महिलांनी व युवतीनीं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला,आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे उदघाटन शिवकथाकार ह.भ.प. अंजलीताई केंद्रे आणि श्रीकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत रांगोळी कलाकारांनी काढलेल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अप्रतिम कलेतून सर्वांना आकर्षित करून आपल्या रांगोळीतून सामाजिक संदेश दिले आहेत.
याप्रसंगी मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते. सर्व नागरिकांनी भेट देऊन कलेचा आनंद घेतला.
