उदयगिरीत पावरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न

0
उदयगिरीत पावरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय ब- विभाग पावरलिफ्टिंग (पुरुष) स्पर्धा महाविद्यालयाच्या व्यायामशाळेमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत ब- विभागातील 8 महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, निवड समिती सदस्य प्रा. डॉ. सचिन चामले, प्रा. डॉ. दिलीप काळे, प्रा. डॉ. मदन गिरी, प्रा. डॉ. नारायण जायभाये, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद शारीरिक शिक्षण महाविद्यालय, उदगीर याप्रमाणे यश संपादन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व पंच म्हणून प्रा. डॉ. डी.आर मुंडे, प्रा. डॉ. शिवानंद पाटील, विजय सूर्यवंशी, ओमकार मंडलेवाले, प्रा. शेख रमजू, प्रताप भालेराव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!