तक्षशिला बुद्ध विहार, काळेगाव येथे दोन हजार वृक्षांचे महावृक्षारोपण संपन्न

0
तक्षशिला बुद्ध विहार, काळेगाव येथे दोन हजार वृक्षांचे महावृक्षारोपण संपन्न

​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर तालुक्यातील तक्षशिला बुद्ध विहार, काळेगाव परिसरात भंते महाविरो थेरो यांच्या संकल्पनेतून दिनांक २५ ऑगस्ट रोजी दोन हजार वृक्षांचे महावृक्षारोपण उत्साहात पार पडले. एकेकाळी उजाड माळरान म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आता भंते महाविरो थेरो यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘नयनरम्य विहार परिसर’ आणि ‘बौद्धांची ऊर्जा भूमी’ म्हणून ओळखला जात आहे.
​यापूर्वी लावलेली झाडे आज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ती परिसराला हिरवीगार सावली देत आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत झाली आहे. हाच वसा पुढे नेत, या नवीन वृक्ष लागवडीसाठी अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील, व्ही.एस. पॅंथर लातूरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, अहमदपूरच्या माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, शेषराव ससाने, अमित रेड्डी, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नाथराव केंद्रे, अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे, युवा नेते रामानंद मुंडे, बजरंग गायकवाड, शरद सोनकांबळे, उपासिका अंजलीताई अरुण वाघंबर, लामंतुरे ताई, आदित्य गुळवे, शेकुभाई, सचिन बानाटे आणि आकाश पवार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
​यावेळी भंते महाविरो थेरो यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की, केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नाही, तर लावलेल्या वृक्षांची योग्य प्रकारे जोपासना करणेही महत्त्वाचे आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे आणि मान्यवरांचे आभार युवा नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे परिसरातील पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!