अहमदपूर मधील काळेगाव तलावात अडकलेल्या व्यक्तीची सुटका
अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावामध्ये पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. नियामत सय्यद (वय ३५ वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रशासकीय अधिकारी, पोलिस दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही बचाव मोहीम यशस्वी झाली.
ही घटना समोर आल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगारकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याला योग्य दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बचाव मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता आली.
पोलिस प्रशासनाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलिस निरीक्षक बि.डी भुसनर यांनीही या बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले. याशिवाय, मंडळ अधिकारी सुनीता ताटीपामुलवार, ग्राम महसूल अधिकारी पूजा कासले, आणि अविनाश पवार यांनीही बचावकार्यात सहभाग घेतला.
या संपूर्ण बचाव प्रक्रियेत NDRF टीम, पोलिस प्रशासन, पत्रकार आणि गावातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नियामत सय्यद यांना सुखरूप बाहेर काढणे शक्य झाले. या यशस्वी बचाव कार्यासाठी सहभागी असलेल्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
