अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे तरुणाची मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या

0
अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे तरुणाची मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे) – तालुक्यातील गोताळा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शंकर बाबुराव माटे (वय ४५) नावाच्या एका तरुणाने गावातील मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते २:३० च्या दरम्यान घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, शंकर माटे हे टॉवरवर चढलेले पाहून गावकऱ्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना खाली उतरण्याची अनेकवेळा विनंती केली. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता टॉवरवरून खाली उडी मारली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​शंकर माटे हे मुंबईमध्ये एका बांधकाम बिल्डरकडे सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांना १७ आणि १९ वर्षांचे दोन मुलगे आणि १३ वर्षांची एक मुलगी आहे. तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शेतात भुईमूग काढत असताना वीज पडली होती, पण त्यातून ते बचावले होते.

​या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शंकर माटे यांच्या मृतदेहाचे शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदरील घटनेची अहमदपूर पोलीसात नोंद करण्यात आली असुन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!