दीपक दुर्गे यांनी आईच्या स्मरणार्थ महाविद्यालयाला दिली ग्रंथांची भेट

0
दीपक दुर्गे यांनी आईच्या स्मरणार्थ महाविद्यालयाला दिली ग्रंथांची भेट

​अहमदपूर ( गोविंद काळे ) ‘प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई…’ या काव्यपंक्तीप्रमाणे आईचं महत्त्व मोठं असून, आईचा विरह असह्य असतो. याच भावनेतून, महात्मा गांधी महाविद्यालयाचे कर्मचारी दीपक दुर्गे यांनी आपल्या आईच्या, कै. मीराबाई रूपचंद दुर्गे यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथांची भेट दिली.
​कै. मीराबाई रूपचंद दुर्गे यांचं २८ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झालं होतं. त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त दीपक दुर्गे यांनी ही अनोखी भेट देऊन आईप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी संत तुकाराम, संत जनाबाई, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांसारख्या महामानवांचे विचार आणि त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके महाविद्यालयाला दिली.
​हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून, यातून त्यांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या ग्रंथभेटीचा स्वीकार विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी केला. या वेळी ग्रंथपाल डॉ. एस. आर. सुळसुळे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. यादव सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी राजेश पाटील, विशाल करंजे, आकाश तांबोळी, मंगेश कदम, गणेश सांडवे, माधव गलाले, अमोल गलाले, सुनील राठोड, बालाजी भुतेवाड, शंकर शेळके आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!