अहमदपूर तालुक्यावर शोककळा: सुनेगाव ( शेंद्री) येथील 37 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू

0
अहमदपूर तालुक्यावर शोककळा: सुनेगाव ( शेंद्री) येथील 37 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर (प्रतिनिधी): नियतीच्या क्रूर घाताने एका होतकरू आणि तरुण जीवनाचा अंत झाला. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील ज्ञानेश्वर माधवराव जायभाये (वय 37) यांचा वर्धा-आर्वी रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर आणि तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आर्वी येथील पोस्ट ऑफिसमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून आर्वीकडे जात असताना, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11 च्या सुमारास काळ त्यांच्यावर घाला घालून बसला. समोरून वेगात येणाऱ्या एका ट्रकशी त्यांची धडक झाली आणि या अपघातात ट्रकच्या बॉडीला डोके आदळून त्यांच्या डोक्याचा अर्धा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच प्राण गेला. त्यांची दुचाकीही ट्रकच्या चाकाखाली येऊन पूर्णपणे चिरडली गेली.
ज्ञानेश्वर जायभाये यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, आजोबा, तीन लहान भाऊ, तीन भावजया आणि भावाची दोन लहान मुले एक मुलगी असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला तरुण मुलगा अचानक सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. या बातमीने अहमदपूर तालुक्यासह सुनेगाव गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वरच्या मृतदेहावर दि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 08: 00 वाजता सुनेगाव (शेंद्री) येथील त्यांच्या स्वताःच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!