आ. बनसोडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविणे म्हणजे उदगीरचा सन्मान – युवा नेते सुनील केंद्रे

0
आ. बनसोडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविणे म्हणजे उदगीरचा सन्मान - युवा नेते सुनील केंद्रे

उदगीर (एल. पी. उगीले) विधानसभा मतदार संघाचे आ. संजयजी बनसोडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुमठा खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने व युवा गणेश मंडळच्या वतीने सुनील भाऊ केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. उदगीरचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तो सन्मान म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सुजाण नागरिकाचा सन्मान होय. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कुमठा गावचे नेतृत्व गाजवणारे धडाडीचे कर्तबगार युवा नेते सुनील भाऊ केंद्रे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्तानेच सामाजिक जाणीवा जपण्यासाठी
रक्तदान शिबिर व जाहीर नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबुराव अण्णा बिरादार, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, रोहिदास कुंडगिर, मुकेश भालेराव, दिनकर केंद्रे, बळी केंद्रे, मंडळाचे अध्यक्ष दीपक जाधव, अतुल केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य, गणेश मंडळाचे सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार संजय भाऊ बनसोडे म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पन्नास वर्षातील बॅकलॉग भरून काढण्याची संधी मला मिळाली. मतदारांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे मलाही गतीने काम करता आले. उदगीर मतदार संघाचा कायापालट करत असताना विकासाचा पॅटर्न निर्माण करता आला याचा मनस्वी आनंद आहे. माझ्या कार्याचा गौरव म्हणजेच माझ्या विधानसभा मतदारसंघाचा गौरव आहे. माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या या गावाने इतका मोठा भव्य दिव्य सत्कार करून गौरव केल्याबद्दल ग्रामस्थांचे ऋणही त्यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!