उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी देव नदीला आलेल्या महापूराने झालेल्या नुकसानीची केली पाहणी.
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील
देवर्जन येथील देव नदीने रौद्ररूप धारण करीत, नदी काठच्या जमिनीचे मोठे नुकसान केले आहे.या नुकसानीची पाहणी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी पाहणी करून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामूळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.अतिवृष्टीच्या काळात देव नदी ही दुथडी भरून किमान दोन हजार फूट रुंदीने वाहत होती. अंबिका रोहिणा, हेर, कुमठा, वायगाव, करडखेल ,महादेव वाडी ,भाकसखेडा ,चिगळी, करखेली आणि गंगापूर या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. देवनदीवर आसलेला देवर्जन मध्यम प्रकल्पाचा ओव्हर फ्लो हा अतिशय रुद्र रूप धारण केलेला पाहावयास मिळाला.देव नदीला आलेल्या महापूराने शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांनी पावसाची संतत धार चालू असतानाच्या परिस्थितीत नदीची प्रत्यक्ष पाहणी किमान तीन किलोमीटर पायी चालून पहाणी केली. आणि शेतकऱ्यांना आश्वासित केले की, शासनाचे जे निकष आहेत त्यानूसार या निकषाच्या बाहेर जावून शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई कशी मिळवून दिली जाईल त्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शेतकर्यांना सुशांत शिंदे यांनी दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बसवराज रोडगे,संग्राम रोडगे, बाळासाहेब पाटील, सूर्यकांत रोडगे, मनोज साकोळकर, विनोद पाटील, संजय भोसले, संतोष पणतोजी, राजकुमार धोत्रे,सूर्यकांत चिल्लरगे, प्रशांत पाटील, राजू वाडीकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी मंडळाधिकारी विजयकुमार उस्तुरे, तलाठी आचमे ,कृषी सहाय्यक सुजाता बनशेळकीकर ,ग्रामसेवक मांडोळे यांना तात्काळ पंचनामे करून सादर करण्याचे आदेश दिले.
देवनदीचे सरळीकरण व पूलांची उंची वाढवावी व तत्काळ ऐकरी पन्नास हजार मदत जाहीर करा अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बसवराज रोडगे यानी केली आहे.
देव नदीचे रुंदीकरण व सरळीकरण झाले तर पूर परस्थीमूळे नूकसान होणार नाही. सरळीकरण व रुंदीकरण झाले तर नदीचे पात्र खोल व रुंद होईल, त्यामूळे पाणी बाहेर पसरणार नाही तसेच देव नदीवरील जे पूल आहेत, त्याची उंची वाढवावी.देवर्जन वरून किमान पंधरा-वीस गावाचा संपर्क आसल्याने पुलावरून पाणी जात असल्यामुळे या गावचा संपर्क तुटत आहे. त्यामूळे या पुलांची उंची वाढवावी. आशी मागणी बस्वराज रोडगे यांनी केली आहे.
