मुख्यअध्यापक एस.एन. पाथरे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

0
मुख्यअध्यापक एस.एन. पाथरे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

उदगीर (प्रतिनिधी) येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय येथे गेल्या 35 वर्षापासून कार्यरत असलेले मुख्याध्यापक एस.एन.पाथरे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य विनोबा भावे शिक्षण संस्थेचे संस्थापक मधुकरराव एकुरकेकर होते. तर आदर्श मुख्याध्यापक गोविंदराव भुरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालय हे देश घडवणारे मंदिर आहे. येणारी पिढी देश सेवेसाठी समर्पित असावी, असे प्रतिपादन आदर्श मुख्याध्यापक भुरे गुरुजी यांनी केले, पाथरे गुरुजींची सेवा ही कायम संस्थेच्या स्मरणार्थ राहील, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मधुकरराव एकुर्केकर यांनी काढले. यावेळी 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या एस. एन पाथरे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक मधुकरराव एकुर्केकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्ती निमित्त मला संस्थेने समाजात मान सन्मान दिला. माझ्या हातून चांगले विद्यार्थी घडले. याचा मला अभिमान आहे. असे यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एन पात्रे म्हणाले. या कार्यक्रमानंतर सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक म्हणून बी आर मुंडे पदभार स्वीकारतील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. एन पाथरे व नूतन मुख्याध्यापक बी.आर मुंडे या दोघांचाही सत्कार संस्थेच्या वतीने व विविध स्तरातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!