प्रणिता होळसंबरे यांची भूमी अभिलेख उपाधीक्षक निवड माने परिवाराकडून सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील प्रणिता तुकाराम होळसंबरे हिची भूमी अभिलेख उपाधीक्षक (डी वाय.एस एल आर.) म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे कौतुक होत असून तिच्या या कार्याला यश आल्यामुळे मित्र, पाहुणे, आई वडिल खूप आनंदी झाले आहेत. तिच्या या निवडीबद्दल शाब्बासकीची थाप म्हणून माने परिवाराकडून तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार शिवश्री राजकुमार माने, सौ लताबाई माने, सुरज माने, किरण बिरादार इत्यादी उपस्थित होते.
