खासदार संजय देशमुख यांची उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर येथे सदिच्छा भेट.
उदगीर (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण जनतेसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे ही खऱ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.याच हेतूने यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खा. संजय देशमुख यांनी उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर येथे सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान खासदारांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. नेत्रदोषाने ग्रस्त असलेल्या गोरगरीब जनतेस अगदी अल्पदरात व उच्च प्रतीची सेवा येथे दिली जाते. हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील रुग्णांना दृष्टीदान मिळावे, कुणीही आर्थिक अडचणीमुळे अंधारात राहू नये, यासाठी रुग्णालयाचे सातत्यपूर्ण कार्य स्तुत्य असल्याचे त्यांनी गौरविले.उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया वतीने खासदारांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावैळी सहसचिव महेश बसपुरे, लाॅ.विवेक जैन,उपस्थित होते. रुग्णालयाचा इतिहास,येथील अत्याधुनिक यंत्रसामग्री, नेत्रदान उपक्रम तसेच मोफत शिबिरांच्या माध्यमातून झालेल्या हजारो शस्त्रक्रियांची माहिती खासदारांना देण्यात आली.खा. देशमुख यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गोर-गरीब व वंचित समाजाला दृष्टी मिळणे हेच सर्वात मोठे दान आहे.उदयगिरी लायन्स नेत्ररुग्णालय हे खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारे केंद्र आहे. अशा संस्थांमुळे समाजात आशेचा किरण पसरतो.” या प्रसंगी रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
