जीवनविकासमतिमंद कर्मशाळेत आरोग्य तपासणी

0
जीवनविकासमतिमंद कर्मशाळेत आरोग्य तपासणी

उदगीर (प्रतिनिधी)
येथील जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेत ‘विस्डम फाउंडेशन’ या स्वयमसेवी संस्थेतर्फे प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी विस्डम फाउंडेशनचे चेअरमन शेख अयाजअली, शेख मुजाहिद उपस्थित होते. शासकीय उपजिल्हा रुग्णालय उदगीर चे मनोरुग्णतज्ञ डॉ. जगदीश रावीकर तसेच डॉ. शोएब शेख यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून औषधोपचार केले. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे लॅब असिस्टंट सिद्दीकी इरफान व रतनदीप कांबळे यांनी प्रवेशित सर्व मुलांची व कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी केली. या कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना कर्मशाळेचे अधीक्षक राजापटेल अ. मलिक यांनी केले. त्यांनी कर्मशाळेतर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम व अकुशल व्यवसाय प्रशिक्षणाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. जगदीश रावीकर आणि शेख अयाज अली यांनी पण येथील कामाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छ व निरोगी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख हिलाल, नागरवाड यादव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!