छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाचा मुंडे आदित्य सेट परीक्षा उत्तीर्ण

0
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाचा मुंडे आदित्य सेट परीक्षा उत्तीर्ण

उदगीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचा विद्यार्थी मुंडे आदित्य हा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी आयोजित केलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाला. 29 जून 2025 रोजी झालेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल मुंडे आदित्य याचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्याला प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उर्मिला शिरशी, डॉ.एस.डी. निटुरे, प्रा.अनुराधा भताने,प्रा.गंभीरे दिपाली, प्रा.उस्ताद हसनत यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मेहनत करून हे यश संपादन केले.त्याचे अभिनंदन प्राणीशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी.शिंदे व सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!