अहमदपूर येथे व्यापारी गुमास्ता व हमाल गणेश मंडळाचे रक्तदान शिबिर

0
अहमदपूर येथे व्यापारी गुमास्ता व हमाल गणेश मंडळाचे रक्तदान शिबिर

​अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील नवा मोंढा येथील व्यापारी, गुमास्ता व हमाल गणेश मंडळाच्या वतीने यंदाही गणेशोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक भावनेचे दर्शन घडवले.
​या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव जाधव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत या सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली.
​शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शौर्य ब्लड सेंटर, अहमदपूर यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले. व्यापारी, गुमास्ता व हमाल गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे अहमदपूर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!