‘टायगर ग्रुप’च्या शाखेचे तालुक्यातील आंबेगावात उद्घाटन

0
‘टायगर ग्रुप’च्या शाखेचे तालुक्यातील आंबेगावात उद्घाटन

​अहमदपूर ( गोविंद काळे ) समाजातील सामान्य आणि गरीब जनतेला मदत करण्याच्या उद्देशाने ‘टायगर ग्रुप’ने अहमदपूर तालुक्यातील आंबेगाव येथे आपली नवीन शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पै. करणसिंग गैरवाल आणि अध्यक्ष पै. भागवत पाटील यांच्या हस्ते झाले.

​यावेळी बोलताना भागवत पाटील म्हणाले, “शाखा स्थापन करणे म्हणजे गावात दहशत निर्माण करणे नाही, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणे आहे.”

     या शाखेच्या माध्यमातून 'टायगर ग्रुप'ने अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भर दिला आहे.

​आई-वडिलांची सेवा: जे लोक आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाहीत किंवा त्यांना त्रास देतात, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ही शाखा काम करेल.
​गोवंश संरक्षण: गायी आणि बैल यांना कत्तलखान्यात नेण्याच्या वाढत्या घटनांवर लक्ष ठेवले जाईल. असे प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
​विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन: विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, पालकांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरित केले जाईल.
​या उद्घाटन सोहळ्याला टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै. जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी जाधव, मराठवाडा अध्यक्ष पै. उमेश पोखरकर यांच्या आदेशानुसार विविध पदाधिकारी उपस्थित होते. यात उमरगा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, तसेच सत्यजित सूर्यवंशी, निखिलसिंग गैरवार, अनुप बिडकर, सुधाकर जायभाये, सरपंच अजय कदम ढाळेगाव, टायगर ग्रुप शाखा अध्यक्ष अनिल पवार, राहुल मोरे, संतोष ढवळे, महेश कच्छवे, आंबेगाव शाखाध्यक्ष कृष्ण पांचाळ, अतुल माने, महेश सूर्यवंशी, राम माने, बालाजी मोरे आणि पुरुषोत्तम जगताप यांचा समावेश होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!