अहमदपूर येथील नागेंद्र भारती मठाची माऊली महाराजांनी केली पाहणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील ब्राह्मण गल्ली येथील पुरातन नागेंद्र भारती मठाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. माऊली महाराज खडकवाडीकर यांनी नुकतीच भेट दिली. या मठाचे ऐतिहासिक महत्त्व असून, अक्कलकोटचे स्वामी समर्थ या ठिकाणी नागेंद्र भारती महाराजांचे शिष्य म्हणून पाच वर्षे वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. स्वामी समर्थांनी काही काळ या मठाचे मठाधिपती म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते पायी चालत अक्कलकोट येथे स्थायिक झाले.
माऊली महाराजांचे स्वागत आणि सत्कार
माऊली महाराजांनी मठाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी मठाचे मठाधिपती रमेश भारती, तसेच हणमंत गिरी, मुरलीधर भारती, संजय भारती, संकेत गिरी, बळी पुरी, संजय पुरी, चंचल भारती, सोनू गिरी, संकेत म्हाळस, रुशी देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
