सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हास्तरीय ग्रामीण तलवारबाजी स्पर्धा संपन्न

0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हास्तरीय ग्रामीण तलवारबाजी स्पर्धा संपन्न

​अहमदपूर ( गोविंद काळे )येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, सम्राट चंद्रगुप्त मौर्य स्कूल आणि तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे 100 खेळाडूंनी सहभाग घेतला.
​स्पर्धेचे स्वरूप आणि उद्घाटनाचा सोहळा
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गणेश हाके पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक दत्ता गलाले, संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवालिका हाके, तालुका क्रीडा समन्वयक प्रशांत माने, कवी प्राध्यापक अनिल चवळे आणि क्रीडा शिक्षक संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
​या स्पर्धेमध्ये सेबर (Saber), ईपी (Epee) आणि फाईल (Foil) या प्रकारांमध्ये 14, 17 आणि 19 अशा तीन वयोगटांत स्पर्धा घेण्यात आल्या.
​प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
उद्घाटनप्रसंगी बोलताना गणेश हाके पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अहमदपूरसारख्या ग्रामीण भागातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
​प्रमुख पाहुणे प्राध्यापक दत्ताभाऊ गलाले यांनी लातूर जिल्ह्यातून सुमारे 300 खेळाडूंनी राज्यस्तरीय पदके मिळवल्याचे आणि 20 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर, तर सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्याचे सांगितले.
​या स्पर्धेचे सूत्रसंचालन राहुल अडसूळ यांनी केले, तर पंच म्हणून मोसिन शेख, आकाश बनसोडे, बबलू शेख सर आणि सुरज कदम यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!