रुद्धा येथील एकता सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

0
रुद्धा येथील एकता सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

​अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा येथे एकता सार्वजनिक गणेश मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वनाथ केंद्रे गुरुजी यांनी भूषवले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ देवकते, मंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे आणि सचिन केंद्रे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणेशाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
​या सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे ४० बालकांनी सहभाग घेतला. ‘देवा श्री गणेशा’, ‘बाप्पा मोरया’, ‘काळीबिंदी’, ‘आमच्या पप्पाने गणपती आणला’ यांसारख्या गाण्यांवर बालकलाकारांनी आपली कला सादर केली. लहान मुलांनी भाषणे, गीतगायन आणि पोवाडे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी बक्षिसांची लयलूट करून दाद दिली.
​या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक, महिला आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
​या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. म्युझिक सिस्टीमची जबाबदारी मयूर केंद्रे आणि चैतन्य केंद्रे यांनी सांभाळली. फोटोग्राफी नागनाथ केंद्रे आणि विनोद होळंबे यांनी केली, तर लाईट सिस्टीम सुधाकर होळंबे आणि मोहन नागरगोजे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सतीश केंद्रे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!