गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे डॉल्बीवर पोलिसांची कारवाई, साऊंड जप्त

0
गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे डॉल्बीवर पोलिसांची कारवाई, साऊंड जप्त

​अहमदपूर ( गोविंद काळे ) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चाकूरकडे जाणाऱ्या एका डीजे डॉल्बीवर अहमदपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मोहिनी साडी सेंटरसमोर हा डीजे पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याचा साऊंड सिस्टीम जप्त केला आहे.

​पोलीस निरीक्षक वीरप्पा भुसनूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक डीजे डॉल्बी लावून निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा डीजे डॉल्बी ताब्यात घेतला.

​ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जप्त करण्यात आलेला डीजे डॉल्बी पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून, संबंधित मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे भुसनूर यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!