जिव्हाळा ग्रुप च्या वतिने शिक्षक दिन उत्साहात साजरा
उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांचे हस्ते जिव्हाळा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे प्रदान
उदगीर (प्रतिनिधी) शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा ग्रुपच्या वतीने जिव्हाळा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा दिनांक ५ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. अशोकराव बिरादार होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी, उदगीर व जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले.
जिव्हाळा ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव फुलसे यांनी स्वागत गीत सादर केले . मान्यवरांचे हस्ते जिव्हाळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा.राजेंद्र बाजीराव चव्हाण, मुख्याधिपिका श्रीमती मंजुषा कुलकर्णी, सहशिक्षिका सौ.शोभा गोपाळ कांबळे, ( उदगीर), सहशिक्षक श्यामलाल चंदर राठोड ( रावणगाव) व श्रीकांत चंद्रकांत हळ्ळे ( हेळंब) याना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे यांनी जिव्हाळा ग्रुप गेल्या बारा वर्षापासून जे कार्य करत आहे त्या कार्याची थोडक्यात माहिती दिली व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. माफसूचे माजी विस्तार संचालक प्रा.डॉ अनिल भिकाने यानी त्यांच्या भाषणात जिव्हाळा आदर्श शिक्षक गुणगौरव प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व पुढील काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा असणार आहे हे ओळखून शिक्षक अधिक तंत्रस्नेही झाला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे सुशांत शिंदे त्यांच्या मनोगतात म्हणाले की पूर्वीच्या काळात शिक्षकाला खूप महत्व होतं शिक्षकावर विश्वास होता समाजात शिक्षक म्हणेल ते पूर्व दिशा होती संपूर्ण समाज शिक्षकाला विचारल्याशिवाय कुठलेच कार्य करत नव्हते पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही यांचा विचार केला पाहिजे आज सुद्धा शिक्षकांना समाजात मान आहे परंतु पूर्वी जो होता तो नाही. त्याने शिक्षकांचे तोंड भरून कौतुक ही केले त्यांना मार्गदर्शन केले पुढील भावी जीवनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप अशोकराव बिरादार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शंकरराव केंद्रे तर आभार प्रदर्शन देविदासराव नादरगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथराव माळेवाडीकर, नवनाथ पाटील, विश्वनाथ मुडपे, रमाकांत मध्वरे , अशोकराव शेल्लाळकर , मुरलीधर जाधव, दिलीप कंधारे, पांडुरंग बोडके, चंद्रकांत रोडगे, लक्ष्मीकांत बिडवई, अशोकराव हळ्ळे , चंद्रकांत पांचाळ,मनोहर खिंडीवाले यानी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाला प्रा विजयकुमार पाटील , शिवाजीराव साखरे , अनंत कदम , सोपानराव माने , रामराव मोमले, वैजनाथ पंचगल्ले, शंकरराव साबणे , मनोहर कुलकर्णी, शरणप्पा खेळगे,सच्चिदानंद पूट्टेवाड , अमृतराव देशपांडे , हागीराव आचारे, हरिश्चंद्र वट्टमवार , पत्रकार व्ही एस कुलकर्णी आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
