विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद होणे महत्त्वाचे आहे – ॲड सुपोषपाणि आर्य

0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद होणे महत्त्वाचे आहे - ॲड सुपोषपाणि आर्य

उदगीर (एल पी उगीले) श्यामार्य कन्या विद्यालयात वर्ग दहावी मधील सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य होते. या कार्यक्रमासाठी वर्ग दहावी मधील सर्व पालक वृंद, विद्यार्थी ,सर्व विषय शिक्षक, मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजय बैले तर पालक प्रतिनिधी म्हणून साहेबराव बिरादार मंचावर उपस्थित होते.
तेजस्विनी आरणे या मुलीने स्वागत गीत गायले. श्यामार्य कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने संस्था अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून कला पंधरवडा, क्रीडा पंधरवडा, प्रश्नमंजुषा असे विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षक, विद्यार्थी, पालक हा सुसंवाद होणे अत्यावश्यक असते. म्हणूनच या विद्यालयात प्रत्येक वर्गाचे पालक मेळावे आयोजित केले जातात. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होन्यासाठी शिक्षक, पालक हितगुज होणे आवश्यक असते, असे प्रास्ताविकातून विजय बैले यांनी मत व्यक्त केले.
श्यामार्य कन्या विद्यालय ही उदगीर शहरातील मुलींसाठी चालणारी नामांकित एकमेव शाळा आहे. या विद्यालयात वर्ग पाचवीपासून मुलींना प्रवेश दिला जातो. विविध स्पर्धा परीक्षा जादा वर्ग चालविले जातात. प्रत्येक शिक्षकांचे विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असते. संपूर्ण शालेय परिसरात कॅमेरे तसेच वर्गात ही सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने मुलगी सुरक्षित असल्याचे आम्हाला खात्री या शाळेतून मिळते. अशा आशयाचे समाधानी मनोगत साहेबराव बिरादार, आरणे,जनार्दन बिरादार,कदम या पालकांनी मत व्यक्त केले ,मानवी देवनाळे आणि अत्तर मेहेक या मुलींनी मनोगत व्यक्त केले .
पालक मेळाव्याचे महत्त्व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, जे पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद साधण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. यामुळे मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि वर्तणुकीवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येते, ज्यामुळे एक मजबूत सहकार्याचे वातावरण तयार होते आणि मुलांच्या प्रगतीला चालना मिळते. विद्यार्थी भविष्यात समाजात निर्भीडपणे जगण्यासाठी त्याचे बीज शाळेत रोवली जातात. पालक-शिक्षक बैठकीमुळे वडीलधाऱ्यांना मुलाच्या कामगिरी, वर्तन आणि शिक्षणाबद्दल संवाद साधण्यासाठी एक सामान्य जागा तयार होते. यामुळे पालकांना त्यांच्या आवड आणि प्रगती समजण्यास मदत होऊ शकते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता खादीवाले तर आभार मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!