श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळ मानाचा राजा गणपती,कपाळे गल्ली ,उदगीर येथे रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.
उदगीर (एल पी उगीले) येथील प्रतिष्ठित मानाचा गणपती श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळ, कपाळे गल्ली ,उदगीर येथे माजी नगरसेवक मनोजअण्णा कपाळे व लार्ड बसवेश्वर प्रि-स्कूल व कोचिंग कलासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या नेतृत्वाखाली खूप सामाजिक ,व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या , त्यात विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश पाटील मानकीकर, शिवा डोंगरे , शिवराज कपाळे, अनिताताई हैबतपुरे ,सरस्वती चौधरी,कल्याण कपाळे, श्याम कुलकर्णी ,डी.एस.बिरादार ,पंकज कालानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न झाले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी मदत करणारे मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद आडे, उपाध्यक्ष विनोद सुरशेटे ,कार्याध्यक्ष अमोल कपाळे, संगम सुरशेट्ये, महादेव पसारे,प्रवीण मुतंगे, रमाकांत वीरकपाळे, महादेव कपाळे, निलेश देशमुख, मन्मथ शेळके, अमोल डोंगरे, अरविंद मुतंगे, नागेश कपाळे, शंकर आवाळे, अजय कपाळे, आशिष बिरादार, प्रवीण कपाळे, अंतेश्वर मुतंगे, अनिता हैबतपुरे, सरस्वती चौधरी,
सुशीलाबाई सुरशेट्टे , निर्मलाबाई कपाळे , सुजाता कपाळे, महानंदा बाई मठपती, शेकाबाई वीरकपाळे,
नागमाबाई हलमंडगे, सविता कपाळे ,
मंगलाबाई मुतंगे, ज्योती सुरशेट्टे, सरुबाई मुतंगे, उषाबाई मुतंगे,
कस्तुराबाई पसारे,यांच्या मदतीने अतिशय भव्यदिव्य बक्षीस वितरण महादेव मंदिर कपाळे गल्ली उदगीर येथे संपन्न झाले.
या वेळी कार्यक्रमामध्ये महादेवाची भक्ती गीते श्याम कुलकर्णी यांनी गायली व सर्वांना मंत्रमुग्ध केली ,
यावेळी त्या ठिकाणी अनेक लहान मुले,त्यांचे आई वडील व रोकडा हनुमान परिसरातील अनेक नागरिक यांनी या कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती .
