रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय मोजमाप व वाटप शिबीर

0
रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय मोजमाप व वाटप शिबीर

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे): रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने, रोटरी प्रांत ३१३२ आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने, अपघातग्रस्त व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय मोजमाप आणि वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रेड्डी हॉस्पिटल, थोडगा रोड, अहमदपूर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.
​या शिबिराचा लाभ केवळ अशा व्यक्तींना घेता येईल ज्यांचे पाय गुडघ्याच्या वरून अपघातात निकामी झाले आहेत. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नाव दि. ४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे.
​या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. कपिल बिरादार, सचिव रो. धोंडीराम ठेवले आणि डिस्ट्रिक्ट चेअर रो. डॉ. वैभव रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. शिबिरात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
​नाव नोंदणीसाठी संपर्क:
​मो. ८८८८७७४३३१
​मो. ९४२३७५७१८१
​मो. ९७६४६१८५००
​रोटरी क्लब ऑफ अहमदपूरने समाजातील गरजू व्यक्तींसाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!