एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना शेतकरी संघटनेचा पाठींबा – रुपेश शंके
क्रांती दिनापर्यंत तोडगा नाही काढल्यास मृत जनावरे कार्यालयात टाकणार
औसा (प्रतिनिधी) : एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांना महा वेट ने उपचारासाठी अपात्र घोषीत करुन विना परवानगी जनावरांवर उपचार केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा केल्यामुळे राज्यभरातील पशुधन पर्यवेक्षक १ ऑगस्ट पासुन बेमुदत संपावर बसले आहेत. त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा देत शेतकरी संघटना पशुधन पर्यवेक्षकांच्या सोबत असल्याची भूमिका शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी मांडली.
राज्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक संपावर असल्याने शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईचा संसर्ग जास्त होत आहे.मात्र त्यांना उपचार करणारे पशुधन पर्यवेक्षक संपावर असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांचा उपचाराअभावी त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू होत आहे. यांची गंभीर दखल घेऊन शासनाने या एल.एस.एस पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षकांना उपचार करण्याची परवानगी द्यावी अन्यथा संपाच्या काळात मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आजारी व मृत जनावरे संबंधित कार्यालयात टाकू असा इशारा रुपेश शंके यांनी दिला.
एल.एस.एस ही पदवीका शासनमान्य असुन, शासनाच्या अनुदानीत विद्यालयातूनच शिकविलेली आहे.मग अचानक ही पदवीका पुर्ण करुन अनेक वर्षांपासून पशुधनाचा उपचार करणारे पशुधन पर्यवेक्षक अपात्र कसे?असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी लवकरच राज्य नेतृत्वाशी चर्चा करून पशुधनाच्या उपचाराचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे रुपेश शंके यांनी सांगितले. यावेळी स.प.वि.अ.श्री.अंगद मेटे, व्यंकट बिराजदार, एकनाथ भोये, रणजित कांबळे, शिवाजी गायकवाड, स्वामी जगताप व्ही डी, प प धुमाळ बी यस,प प जाधव के ए च, प प कठारे ए.एस , प प कळवले यस एन,शेख ए एम, सेवादाता पांडुळे ए एस,सेवादाता, उबाळे एन एस , कोडे एस एन, मेणगुळे एम डी, कांबळे आर आर, माळी बी व्ही,पटेल एम एम, अंबुलगे आर टी, माने युवराज, घोडके आकाश, ओंकार व्ही.जगताप आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.