कुशल मनुष्यबळ हाच भारताच्या प्रगतीचा आधारप्रा अनिल चवळे.
अहमदपूर( गोविंद काळे )
कुशल मनुष्यबळ हाच भारताच्या प्रगतीचा आधार असून, ग्रामीण भागातील तरुणांईला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे ही संधी प्राप्त होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्किल आत्मसात करून परिपूर्ण शिक्षण घ्यावे असे मत प्राध्यापक अनिल चवळे यांनी अहमदपूर येथील
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वर्ष 2025 -26 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थे तर्फे आयोजित पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य शिवाजीराव कवलेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आय एम सदस्य महेश महाजन, सुरवसे व्ही व्ही , गटनिदेशक तुकाराम सुरवसे, विद्यार्थ्याचे पालक माने व चौधरी हे उपस्थित होते.
कुशल मनुष्यबळ हीच भारताची शक्ती आहे,. विशेषतः ग्रामीण भागातून येणारी तरुण पिढी देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या तरुणांना आवश्यक कौशल्ये प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याे कार्य करत आहे असे प्रा चवळे यावेळी बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य शिवाजीराव कवलेकर यांनी करताना संस्थेबद्दलची संपूर्ण माहिती सांगितले व कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितले आणि
ग्रामीण भागातील कुशल तरुणाई: एक सुप्त शक्ती असल्याचे सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक वरदान ठरत आहेत. या संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ,इलेक्ट्रिशियन, वायरमन ,फिटर, वेल्डर, मोटर मेकॅनिक, यांसारख्या विविध ट्रेडमध्ये प्रात्यक्षिक-आधारित प्रशिक्षण दिले जाते. . या संस्थेचे माजी विद्यार्थी आज देशभर खूप मोठ्या पदावर असल्याचे त्यांनी सांगितले व औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून यांच्यासाठी रोजगार मिळवून देण्याचे कार्य केले आहे असे ते यावेळी म्हणाले.
आय एम मेंबर महेश महाजन यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अनेकदा रोजगाराभिमुख कौशल्यांचा अभाव असतो. त्यामुळे, पदवी घेऊनही अनेक तरुण बेरोजगार राहतात. याउलट, ITI सारख्या संस्थांद्वारे दिले जाणारे व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना तात्काळ रोजगारासाठी पात्र बनवते. या शिक्षणामुळे त्यांना केवळ नोकरीच नाही, तर स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठीही आत्मविश्वास मिळतो.
ग्रामीण भागातील कुशल तरुण देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहे असे यावेळी महेश महाजन म्हणाले.
या पालक मेळावा मध्ये संस्थेच्या विविध शाखा मधील शिक्षकांनी नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेची शिस्त नियम, मिळणाऱ्या सवलती, विविध शिष्यवृत्ती योजना, संस्थेत वावरत असताना घ्यावयाची काळजी, शासकीय योजना व प्रवेश प्रक्रिया याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली.
गटनिदेशक तुकाराम सुरवसे यांनी ऑन द जॉब ट्रेनिंग, विद्यार्थी व पालक यांचे कर्तव्य, शिक्षकाकडून होणारे मार्गदर्शन, व संस्थेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्य सांगितले.
यावेळेस गतवर्षी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राका सर यांनी केले तर आभार गटनिदेशक तुरे सर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येतील कर्मचारी गटनिदेशक सुरवसे सर, तुरे सर, राका सर ,बानीकर सर, मस्के मॅडम, बोरुळे सर पठाण सर, पांडव सर, सिंपले सर ,जांभळे मॅडम, दास सर लोकरे सर यांच्यासह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
