अहमदपूर शहरात 4.20 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार शुभारंभ

0
अहमदपूर शहरात 4.20 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार शुभारंभ

​अहमदपूर (गोविंद काळे) — अहमदपूर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन येत्या रविवारी, 14 सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप टेंभुर्णी रोड येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
​या विकासकामांमध्ये शहरातील विविध प्रभागांमधील नागरी सुविधांचा समावेश आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, मुख्याधिकारी संतोष लोमटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता गोविंद भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
​राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अहमदपूर शहरातील सर्व नागरिकांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!