संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मैदानी खेळात उत्कृष्ट यश

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मैदानी खेळात उत्कृष्ट यश

​अहमदपूर, ( गोविंद काळे): अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
​या स्पर्धेत, १४ वर्षे वयोगटात सुरज तुकाराम केंद्रे या विद्यार्थ्याने ८० मीटर हर्डल्स रनिंग आणि उंच उडी या दोन्ही प्रकारांत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, गोळाफेक स्पर्धेत सिद्धांत शिवकुमार खेडकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्त, स्वराज गजानन गुंडीले याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी तर सोनाक्षी सूर्यकांत बनसोडे हिची बॅडमिंटन स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
​या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक जहांगीर मंगरुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके-पाटील, सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, उपाध्यक्षा अॅड. मानसी हाके, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापिका मीना तोवर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!