तानाजी माने ‘छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

0
तानाजी माने 'छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५' ने सन्मानित

अहमदपूर, ( गोविंद काळे )
सोशल बबल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणेच्या वतीने देण्यात येणारा उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार’ यावर्षी शिव स्वराज्य उद्योग समूहाचे आयुर्वेद आरोग्य सल्लागार माजी सैनिक तानाजी शिवराम माने यांना यावर्षीचा ‘छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५ ‘ नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माजी सैनिक तानाजी माने यांनी २२ वर्षे सैन्य दलाच्या माध्यमातून देशाची सेवा केली तसेच मागील आठ वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये आयुर्वेद आरोग्य सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सोशल बबल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचे सीईओ संकेत आंबेकर यांनी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते तानाजी माने यांना ‘छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार – २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात केले आहे.
यावेळी तानाजी माने यांच्या परिवारातील सदस्यांसह आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे बापुसाहेब काळे यांची उपस्थिती होती.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तानाजी माने यांचे ज्येष्ठ समीक्षक तथा कादंबरीकार महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, ह.भ.प. अनिल महाराज मुंढे, डॉ. संतोष पाटील, डॉ. सतीश ससाणे, डॉ. प्रकाश चव्हण, यांच्यासह राजकीय, सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील मित्र परिवारांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!