दयानंद शिक्षण संस्थे च्या वतीने महाविद्यालयातील ११ वी १२ च्या विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी tab देणारे लातूरचे पहिले दयानंद महाविद्यालय
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वृध्दी वाढवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार दयानंद विज्ञान महाविद्यालयातील ११ वी १२ वी Jee बँच च्या सर्व विद्यार्थ्यांना tab वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी Tab देणारी लातूरची दयानंद शिक्षण संस्था पहिली ठरली आहे या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांनी संस्थेचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे. दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना tab चे वाटप दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमनजी लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ दिलीप जगताप, पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने, पर्यवेक्षक प्रा. हेमंत वरुडकर, उपस्थित होते.
विद्यार्थ्यासठी उज्वल भविष्यासाठी संस्था सदैव तयार आहे – लक्ष्मीरमन लाहोटी
यावेळी बोलताना लक्ष्मीरमनजी लाहोटी म्हणाले की कोविड १९ च्या काळात संस्थेने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देवून विद्यार्थ्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षन देत जानेवारी महिन्यात पालक मेळाव्यात घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थ्यास आज Tab वाटप करीत असून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी या Tab मध्ये स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले असून त्यामुळे विद्यार्थ्यास अभ्यास करणे व परीक्षा देणे अतिशय सोपे होणार आहे विद्यार्थ्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था सदैव तत्पर राहील असा विश्वास देत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी Jee चे समन्वयक प्रा. रविकुमार, प्रा. डी. एम. सुर्यवंशी, प्रा. गोपिकृष्ण, महेंद्र कोराळे, प्रा. कैले, प्रा. यादव, प्रा. शेळगे,यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बळवंत सुर्यवंशी यानी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मिलींद माने यांनी मांडले.