जीएमजीच्या संगीतमय योगामुळे लातूरकर मंत्रमुग्ध गुडमॉर्निंग ग्रुपचा दुसरा वर्धापण दिन सामाजिक उपक्रमाने साजरा
लातूर (प्रतिनिधी) : गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाही गुडमॉर्निंग ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.विकास निलंगेकर यांच्या उपस्थितीत संगितमय योगा घेण्यात आला. या विधायक उपक्रमामुळे उपस्थितांचा आनंद द्विगुनित झाला असून यावेळी उपस्थित व्यायामप्रेमीही संगीतमय योगा पाहून मंत्रमुग्ध झाले.
यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेएमजीचे अध्यक्ष राजेश कोळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून योगतज्ज्ञ डॉ. विकास निलंगेकर, सह्याद्री वाहिनीचे प्रतिनिधी दिपरत्न निलंगेकर, अविनाश माळवदकर, प्रदिप कुलकर्णी, बीएसएनएलचे अधिकारी हितेंद्र तिवारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुर्य नमस्कारसह विविध व्यायाम घेण्यात आले. याबरोबरच यंदाही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, गोरगरीबांना शालीचे वाटप, स्वच्छता अभियान असे विधायक उपक्रम घेण्यात आले. तसेच दैनंदिन कामकाजातून थोडासा दिलासा मिळावा यासाठी सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी जीएमजी ग्रुपचे सचिव बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सुशिल गायकवाड, कोषाध्यक्ष नागेश गाथाडे, व्यंकट कडणे, सतीश पवार, रंगनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर भिसे, साईनाथ लोमटे, तेजस चव्हाण, सतीश वाकडे, भगवानराव काकडे, काकासाहेब जाधव, सतीश सुवर्णकार, विनायक खंदारे, बाळू खेलगवळी, भारती, शिलरत्न निलंगेकर, निलेश कांबळे, अॅड. संतोष पाटील, समर्थ कोळी, समृध्दी कोळी यांच्यासह जीएमजीच्या पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार नागेश गाथाडे यांनी मानले.