महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.पांडुरंग चिलगर यांच्यावर वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात हिंदी विभागाचे सहायक प्राध्यापक व एन.एस.एस.चे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांचा वाढदिवसा निमित्त विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते डॉ. चिलगर. यांचा शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी महाविद्यालयास वृक्ष भेट दिले. तसेच लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या अहमदपूर तालुका शाखेच्या वतीनेही डॉ. चिलगर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ल.सा.क.म. संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश भालेराव, प्रा. बालाजी कारामुंगीकर, शरद सोनकांबळे, प्रा. दिलीप भालेराव, गंगाधर साखरे आदिंनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी डॉ. अनिल मुंढे, डॉ. नागराज मुळे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. बी. के. मोरे, डॉ.ए. एस. मोरे , डॉ. पी.पी.चौकटे, प्रा. ए.सी. आकडे, डॉ. डी. एन. माने , डॉ. सचिन गर्जे , अजय मुरमुरे , चंद्रकांत धुमाळे , वामन मलकापुरे , शिवाजी चोपडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
हिंदी विभागाच्या वतीने वाढदिवस साजरा-
महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने विभाग प्रमुख प्रा डॉ नागराज मुळे यांनी प्रा. डॉ.पी.डी.चिलगर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून शाल, श्रीफळ दिले.यावेळी ही.भ.प. डॉ.अनिल महाराज मुंढे डॉ.सतीश ससाणे,व लिपीक अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, ग्रंथपाल पी.एम.इंगळे, शिवाजी चोपडे, वामनराव मलकापुरे, हुसेन शेख आदिंची उपस्थिती होती.
महाविद्यालय विकास समितीच्या वतीनेही शुभेच्छा…
महाविद्यालयांतील ‘महाविद्यालय विकास समिती’ (सी. डी.सी.) च्या वतीने समितीचे सदस्य सचिव प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, डॉ.अनिल मुंढे, डॉ.सतीश ससाणे, डॉ.बब्रुवान मोरे, डॉ. एन.यु.मुळे, प्रशांत डोंगळीकर, यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
ग्रंथालय विभागाकडून अभीष्टचिंतन…!
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून ग्रंथपाल पी.एम.इंगळे यांनी प्रा. डॉ. पी.डी.चिलगर यांच्या वाढ दिवसानिमित्त शाल, श्रीफळ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रंथालय परिचर वामनराव मलकापुरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.