संत ज्ञानेश्वर माऊली शाळेत आजी-आजोबा पूजन सोहळा उत्साहात संपन्न

0
संत ज्ञानेश्वर माऊली शाळेत आजी-आजोबा पूजन सोहळा उत्साहात संपन्न

उदगीर (एल पी उगीले) येथील संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आजी-आजोबा पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला आजी-आजोबा, पालक, शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये बहुमोल कामगिरी करणारे स्वामी रामानंद तीर्थ, भारत देशाचे पहिले गृहमंत्री व पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे प्रतिमेचे पूजन करून

विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांवर आधारित गाणी, नाटिका, श्लोक व कविता सादर करून सर्वांचे मन मोहून घेतले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांवरील अनुभव कथन करताना सभागृहातील वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमादरम्यान आजी-आजोबांचा सन्मान करून त्यांना पुष्पहार व भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच त्यांचे पाय धुवून ,त्यांचे पूजन त्यांच्या नातवंडांनी केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मठपती व श्रीमती सरदार, संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटूरे, मुख्याध्यापिका अनिता जगताप उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मुलांच्या संस्कारांचे पहिले शाळा म्हणजे कुटुंब, आणि त्यातील आजी-आजोबा हेच खरे संस्कारविभूषित गुरू असतात. त्यांच्या सहवासातून मुलांना जीवनमूल्ये, प्रेम, आदर आणि संयम यांचे धडे मिळतात.”
मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षक मेटकर सुरेखा यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन वर्षा पवार यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आजी-आजोबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. तसेच शाळेत आपुलकीचे, संस्कारमय वातावरण अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमाचा उद्देश नातवंडांना आपल्या आजी-आजोबांविषयी प्रेम, आपुलकी गोडी वाटावी,
ते उतरत्या वयामध्ये ओझे न वाटता त्यांचे आजी आजोबांवर प्रेम वाढावे व आपल्या भारताची संस्कृती अशीच जपून राहावी, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!