हावगीस्वामीच्या सादिया सय्यद यांना तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे पारितोषिक
उदगीर (प्रतिनिधी)
हिंदी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी विभागातील पदव्युतर व संशोधन केंद्राच्या वतीने हिंदी भाषेत तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील सादिया नदीम सय्यद बी.एस्सी. तृतीय वर्ष या विद्यार्थिनींने दुसरे पारितोषिक प्राप्त केले. रोख रक्कम एक हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर हिंदी भाषेत सादियाने मांडणी केली होती. सदरील विद्यार्थिनीस डॉ.म.ई.तंगावार व प्रा.धनराज बंडे यांचे मार्गदर्शन लाभले.सादिया महाविद्यालयातील निबंध, वक्तृत्व, व वादविवाद मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुसरे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, उपप्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर, निबंध, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीचे प्रमुख डॉ.म.ई.तंगावार, मंडळातील सर्व सदस्य, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
