हजारो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत एसटी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले.

0
हजारो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत एसटी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले.

उदगीर (प्रतिनिधी): देश स्वतंत्र झाल्यापासून बंजारा समाज अनुसुचित जमातीचे सर्व निकष पुर्ण करत असुन सुध्दा बंजारा समाजातील अशिक्षित पणचा गैरफायदा घेत बंजारा समाजास या आरक्षणा पासुन वंचित ठेवुन मोठा अन्याय आज पर्यतच्या राज्यकर्त्यांनी केला आहे. तरी मराठा समाजास जसा हैद्राबाद गॅझेटनुसार न्याय दिला, त्याच प्रमाणे बंजारा समाजास सुध्दा हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देवुन न्याय द्यावा, या मागणीसाठी उदगीर येथे बंजारा आरक्षण कृती समिती, उदगीर , जळकोट (जिल्हा लातूर) यांच्या वतीने हजारो बंजारा बांधवांसह उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनाद्वारे समाजाच्या दीर्घकालीन सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. उपस्थित समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकजूट दाखवत पुढेही संघटित स्वरूपात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.समाजाच्या हक्कांसाठी लढा अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. अशी माहिती बंजारा संघटनेचे युवा नेते संजय राठोड यांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!